अमेरिकेत भारतीय वंशाच्या जोडप्याला गोळ्या घालून आरोपीची आत्महत्या
वॉशिंग्टन, दि. 07 - भारतीय वंशाच्या जोडप्याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असल्याची घटना घडली आहे. नरेन प्रभु असे त्यांचे नाव होते. नरेन हे आपल्या कुटुंबाबरोबर सेन जोस येथे वास्तव्यास होते. प्रभु आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या निवासस्थानीच गोळ्या घालून ठार करण्यात आले. मिर्जा ततलिक असे आरोपीचे नाव असून घटनास्थळी त्याचाही मृतदेह आढळला आहे. मिर्जा हा नरेन यांच्या मुलीचा प्रियकर होता. घटना घडली त्यावेळी प्रभु, त्यांची पत्नी, त्यांचा 13 वर्षीय मुलगा आणि आरोपी उपस्थित होते. मात्र आरोपीने त्यांच्या मुलाला काही केले नसल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीने शरणागती पत्करण्यास नकार दिला होता.
या घटनेची माहिती आम्हाला प्रभु यांच्या मुलाने दिली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा प्रभु दांपत्य आणि आरोपी मृत अवस्थेत आढळले, असे पोलिसांनी सांगितले. मिर्जा याने या दोघांची हत्या का केली यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.