‘आप’चे माजी मंत्री कपिल मिश्रांना जीवे मारण्याची धमकी
नवी दिल्ली, दि. 10 - ‘आप’चे माजी मंत्री कपिल मिश्रांना यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांनी आप नेते सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याचं आपण पाहिलं आहे असा सनसनाटी आरोप मिश्रा यांनी केला होता. त्याच्यावरूनच मिश्रा यांना जीवे मारण्याच्या धमक्यांचे फोन येत असल्याचं समजतं आहे.
दरम्यान, मिश्रा यांनी फोन न उचलल्यावर त्यांना व्हॉट्सअॅपवर गोळी मारुन ठार करु असा धमकीचा मेसेज पाठवण्यात आला. हा फोन आंतरराष्ट्रीय नंबरवरून आल्याचं कळतं आहे. कपिल मिश्रा मागील चार दिवसांपासून मुख्यमंत्री केजरीवालांविरोधात नवनवे खुलासे करत आहेत. कपिल मिश्रांनी ‘आप’च्या इतर नेत्यांविरोधातही मोहीम सुरु केली आहे. मिश्रा यांनी उपोषण सुरु केलं आहे. आप नेत्यांच्या परदेशी दौर्यांसाठी कुठून फंडिंग होतं हे जाहीर करावं अशी मागणी कपिल मिश्रांनी केली आहे.