लहान शहरात विमान सेवा सुरु करण्यासाठी इंडिगो 50 विमान खरेदी करणार
नवी दिल्ली, दि. 10 - पंतप्रधान मोदींच्या उडाण योजनेअंतर्गत लवकरच लहान शहरांमध्ये विमान सेवा सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर लहान शहरात विमान सेवा सुरु करण्यासाठी इंडिगो एअर लाईन्स कंपनी 50 लहान विमानांची खरेदी करणार आहे. कंपनीने एटीआर प्रणालीच्या 50 विमान खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे.
कंपनी संचालक मंडळाच्या बैठकीनंतर याबाबतची घोषणा करण्यात आली. यासाठी फ्रान्सच्या कंपनीसोबत एटीआर 72-600 प्रणालीच्या 50 विमानांसाठी टर्मशीटवर स्वाक्षर्या झाल्या. या पहिल्या प्रयत्नात कंपनीला किती विमानांचा पुरवठा होऊ शकतो याचं निरिक्षण करुन या कराराला अंतिम रुप देण्यात येणार असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं.
एटीआरच्या माध्यमातून 2017 च्या अखेरपर्यंत सर्व लहान शहरात उडाण योजनेअंतर्गत विमानसेवा सुरु करायचं कंपनीचं लक्ष्य असल्याचं इंडिगोचे अध्यक्ष आदित्य घोष यांनी यावेळी सांगितलं. घोष म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडाण योजनेअंतर्गत आम्ही संपूर्ण देशात क्षेत्रीय विमान सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहोत. या माध्यमातून ज्या शहरांना विमान सेवेचा फायदा मिळाला नाही, त्यांना याचा सर्वाधिक फायदा होईल. केंद्र सरकारने लहान शहरांमध्ये विमानसेवा सुरु करण्यासाठी उडाण योजनेची घोषणा केली. यासाठी एटीआर विमानांमुळे लहान शहरात विमान सेवा सुरु करणं शक्य होणार आहे. या अंतर्गत एका तासाच्या विमान सफरीसाठी प्रवाशांना 2500 रुपये मोजावे लागतील.