पाणी टिकविण्यासाठी वृक्ष संवर्धनाची गरज : आ. खडसे
मुक्ताईनगर, दि. 28 - दिवसेंदिवस हवामानात बदल होत असून पावसाचे प्रमाणही कमी होत आहे. जमिनीतील पाण्याचा मात्र उपसा मोठ्याप्रमाणात होत आहे. त्याप्रमाणातच पाणी जिरवणो गरजेचे आहे, जमिनीत पाणी टिकून राहावे यासाठी झाडे मोठ्याप्रमाणावर जगवणो व संवर्धन करणो आवश्यक आहे. आणि सामूहिक प्रयत्नांनीच गरज असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी तालुक्यातील हरताळे शिवारातील हनुमान मंदिरावर शेती शिवार पाहणी व शेतकर्यांशी संवाद या शासनाच्या अभियानाअंतर्गत केले.
सदर शेत शिवार पाहणी कार्यक्रम व शेतकरी संवाद अभियान सकाळी 10 वा चिंचखेडा बुद्रुक, दुपारी 1 वाजता हिवरा, संध्याकाळी 7 वा हरताळा शिवार हनुमान मंदिर हरताळा फाटा असा पार पडला. तर चिंचखेडा, मधापुरी येथे शेती शिवार पाहणी, काकोडा, पारंबी येथे गॅस वाटप करण्यात आले. शेतकरी संवादाने या अभियानाचा समारोप हरताळे येथे करण्यात आला.