Breaking News

अवैध वाळू वाहतूकप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव, दि. 28 - सावखेडा शिवारातील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक केल्याप्रकरणी शिवसेना महानगरप्रमुख कुलभूषण पाटील यांच्या मालकीचे  डंपर तलाठी व मंडळाधिका-यांनी गुरुवारी मध्यरात्री पकडले. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला कुलभूषण पाटील व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. 
मंडळ अधिकारी अमोल पाटील यांना सावखेडा शिवार, वाघनगर रोडवर, मोहाडी ते नागङिारी रोडवर व कानळदा रोडवरून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची  गोपनीय माहिती मिळाली होती़ त्यानुसार पाटील यांना आव्हाणे येथील तलाठी मनोहर बाविस्कर सोबत घेत खाजगी वाहनाने रात्री 12 वाजता सावखेडा शिवार गाठल़े  सावखेडा बुद्रूक गावापासून 400 मीटर अंतरावर दोन्ही अधिकारी झाडाझुडपांमध्ये दबा धरून बसल़े या मार्गाने जात असलेला 2 ब्रॉस वाळू असलेला डंपर पकडला व  तालुका पोलीस ठाण्यात जमा केला़. चालक शेख इकबाल शेख भिकन, रा़आव्हाणे यास पकडले असता, त्याने हा डंपर कुलभूषण पाटील रा़मयुर कॉलनी पिंप्राळा  यांचा असल्याचे सांगितले. या वृत्तास तपासाधिका-यांनीही दुजोरा दिला.