बारावी सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर, रक्षा गोपाळ देशात पहिली
नवी दिल्ली, दि. 28 - बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल लागला आहे. नोएडामधील रक्षा गोपाळ या विद्यार्थीनीने 99.6 टक्के मिळवत देशातून पहिला क्रमांक पटकावला आहे. देशभरात सीबीएसईचा एकूण निकाल गेल्या वर्षीपेक्षा 1 टक्क्याने घसरून 82 टक्के इतका लागला आहे. सीबीएसईच्या संकेतस्थळांवर बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला.
दरम्यान आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल दि. 29 दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहे. बारावी एचएससीचा निकाल कधी लागणार, याची माहिती उद्या जाहीर केली जाणार आहे. 30 किंवा 31 मे रोजी राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागण्याची शक्यता आहे.