रैनाच्या ऑटोग्राफसाठी सुरक्षा भेदून चाहता थेट मैदानात!
कानपूर, दि. 11 - क्रिकेट चाहते आपल्या आवडत्या क्रिकेटरसाठी काहीही करायला तयार असतात. याचाच प्रत्यय कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध गुजरात लायन्स यांच्यातील सामन्यात आला.
गुजरातचा कर्णधार सुरेश रैनाचा एक चाहता ऑटोग्राफ घेण्यासाठी सुरक्षा भेदून मैदानात धावत आला. मैदानात येताच तो थेट सुरेश रैनाजवळ गेला. रैनाच्या नावाची जर्सी घालून मैदानात आलेल्या या चाहत्याने काही वेळासाठी खेळही थांबवला. मैदानातील हे चित्र पाहून सर्वांच्याच नजरा या प्रसंगाकडे वळल्या. खेळात अडथळा आणल्यानंतर पंचांनी चाहत्याला मैदानाबाहेर जाण्याची विनंती केली. मात्र चाहत्याने रैनाचे पाय धरले. त्यानंतर रैनानेच स्वतः चाहत्याला बाहेर जाण्याची विनंती केली.