Breaking News

शिल्पा शेट्टीसह राज कुंद्राला अटकपूर्व जामीन, कुंद्राची चौकशी

भिवंडी, दि. 11 - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांना ठाणे सत्र न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे. 24 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी  दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर राज कुंद्राने भिवंडीच्या कोनगाव पोलिस ठाण्यात हजेरी लावत आपला जबाब नोंदवला. राज कुंद्रा आणि कंपनीचे  संचालक दर्शित शाह यांनी भिवंडी पोलिस ठाण्यात हजेरी लावत जबाब नोंदवला. जवळपास तीन तास त्यांची चौकशी झाल्याची माहिती आहे. गुरुवार आणि  शुक्रवारीही त्याला हजेरी लावावी लागणार आहे.
भिवंडीचे कापड व्यावसायिक रवी भालोटिया यांनी राज कुंद्रासह शिल्पा शेट्टी आणि बेस्ट डील टीव्ही कंपनीच्या 3 संचालकांविरोधात 24 लाखांच्या फसवणुकीची  तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयानं सर्वांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.