शीतल उगले यांनी स्वीकारला अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार
पुणे, दि. 12 - पुणे महापालिकेच्या नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी गुरुवारी सकाळी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. महापौर मुक्ता टिळक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी महापालिका आयुक्त कुणाल कुमार, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आदी उपस्थित होते. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी रायगडच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या उगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी मावळते अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांचाही सत्कार महापौरांच्या हस्ते करण्यात आला.
