पिंपरीमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडले
पिंपरी चिंचवड, दि. 09 पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडवरून राजकारण तापले असता भाजपमध्ये एकमत नसताना बाबू नायर, मोरेश्वर शेडगे आणि माऊली थोरात यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावण्यात आली आहे.
एकूण 3 जागांसाठी 150 हून अधिक इच्छूक आहेत. इच्छुकांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू होती. या तीन पदांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी 5 वाजेपर्यंत वेळ घेतली होती. पण अधिक गोंधळ होऊ नये यापूर्वी स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर करून भाजपने परिस्थिती हाताळली आहे. पुण्यात स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून जो राडा झाला आहे. तसा प्रकार या ठिकाणी होऊ नये यासाठी भाजपमध्ये खबरदारीने पाऊले उचलली जात आहे.