Breaking News

गंभीरला संघात स्थान न मिळाल्याने बीसीसीआय, कोहलीवर टीका

मुंबई, दि. 09  पुढील महिन्यात इंग्लंड महिन्यात होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा, मोहम्मद शामी आणि रविचंद्रन अश्‍विनचे पुनरागमन झालेय तर बीसीसीआयच्या निवड समितीने ऋषभ पंत, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, सुरेश रैना आणि दिनेश कार्तिक यांना स्टँडबाय म्हणून ठेवले.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील या संघात वेगळे असे काही बदल करण्यात आलेले नाहीत. सध्याच्या आयपीएलमध्ये केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर जबरदस्त कामगिरी करतोय. मात्र त्यानंतरही त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. गंभीरला संघात स्थान न देण्यात आल्याने बीसीसीआय तसेच कोहलीवर सोशल मीडियावरुन जोरदार टीका केली जात आहे. तर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या निवडीवरही टीका केली जात आहे.