गदाद येथे झालेल्या स्फोटात चार पोलीस अधिका-यांसह 11 ठार
बगदाद, दि. 21 - बगदादमध्ये झालेल्या चारचाकीच्या स्फोटामध्ये चार पोलीस अधिका-यांसह 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. इराक पोलीस आणि रुग्णालयाच्या अधिका-यांनी ही माहिती दिली आहे. हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनी घेतली नसून हा हल्ला इसिसने घडवून आणल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पहिला स्फोट पोलीस चौकीवर करण्यात आला. त्यानंतर काही वेळातच दुसरा हल्ला रहदारीच्या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती अधिका-यांनी दिली.