Breaking News

महिला पत्रकार संमेलनानिमित्त ‘सौदामिनी’ लेख स्पर्धा

मुंबई, दि. 28 - नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्टस् महाराष्ट्र संलग्न एनयुजे इंडिया नवी दिल्लीच्या वतीने 24 व 25 जून रोजी देशव्यापी महिला पत्रकार संमेलन पनवेल येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनासाठी देशभरातून महिला पत्रकार उपस्थित रहाणार असून हे पहिले देशव्यापी संमेलन आहे. या संमेलनाचाच एक भाग म्हणून ‘सौदामिनी’ लेख स्पर्धा घेण्यात येणार आहे. ‘प्रसारमाध्यमांतील महिला सुरक्षा, अपेक्षा व आव्हाने’ हा लेखाचा विषय असून मराठी, हिंदी किंवा इंग्रजी कोणत्याही भाषेत लेख लिहिता येणार आहे. लेख 700 शब्दांचा असणे आवश्यक आहे. लेख पाठवण्याची मुदत 30 मे 2017 आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त जणांनी सहभाग घ्यावा, असे आवाहान आयोजकांकडून (ज्ञरीीवशज्ञरी.ी1 सारळश्र.लेा /7021616645) करण्यात आले आहे. पुरस्कारप्राप्त विजेत्यांना सौदामिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. त्यांचे लेख सौदामिनी या संमेलन विशेषांकात प्रसिद्ध केले जातील. तसेच या स्पर्धेतील लेखात वेगळे व परिवर्तन घडवून आणणारे विचारही सौदामिनी विशेषांकात प्रसिद्ध केले जातील.