पनवेलमध्ये भरणार महिला पत्रकारांचे पहिले राष्ट्रीय संमेलन
मुंबई, दि. 28 - नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र आयोजित महिला पत्रकारांचे पहिले राष्ट्रीय संमेलन 24 आणि 25 जून रोजी पनवेलच्या आद्यक्रांतीकावीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र (संलग्न नँशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस इंडिया, नवी दिल्ली) च्या वतीने महिला पत्रकारांचे दोन दिवसाचे राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात देशभरातील आपल्या अधिकारांसाठी लढणार्या 500हून अधिक महिला पत्रकार सहभागी होणार आहेत.
भारतात मध्यमवर्गातील महिला पत्रकार म्हणून नोकरी करतात. त्यांची संख्या मोठी आहे मात्र गुणवतेच्या दृष्टीने त्यांच्या हक्काचे स्थान त्यांना मिळत नाही आणि बहुसंख्य महिला पत्रकारांना अनेकदा कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने महिलांसाठी सुरक्षा व्यवस्थेसाठी देशातील सर्वच राज्यांना आदेश दिले आहेत. पत्रकार आणि पत्रकारेतर्नच्या हितासाठी लढणारी राष्ट्रीय संघटना नँशनल यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स (इंडिया) अनेक वर्षांपासून अशा प्रकारच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी लढते आहे. माध्यमकर्मींसाठी सर्व सुरक्षा कायद्या-आयोगाची मागणी सातत्याने करीत आहोत. काही प्रमाणात ‘एनयूजे’ची ही मागणी पूर्ण झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक माध्यमात ‘विशाखा कायद्या’ची अंमलबजावणी व्हावी म्हणून एनयुजे महाराष्ट्रची लढाई सुरूच आहे. म्हणूनच देशभरातील जागरूक महिला पत्रकारांना एकत्र आणून यावर मंथन होण्याची व त्यातून पुढील दिशा ठरविण्याची निकड होती. त्यासाठी एनयुजे महाराष्ट्रच्या वतीने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभातील महत्त्वपूर्ण पाईक असणार्या देशभरातील महिला माध्यमकर्मीचे संमेलन घेण्यात येत आहे, अशी माहिती अध्यक्ष डॉ. उदय जोशी यांनी दिली. महाराष्ट्रातील 10 महिला माध्यमकर्मीना त्यांच्या लक्षणीय योगदानासाठी गौरविण्यात येणार आहे.
संमेलनाच्या उद्घाटनास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तर 25 जूनला होणार्या समारोपासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर व गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांना निमंत्रित केले आहे. या निमित्ताने एका स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.