Breaking News

दुय्यम निबंधक कार्यालयातील दलाली बंद करा - संभाजी ब्रिगेडची मागणी

अहमदनगर, दि. 24 - दुय्यम निबंधक कार्यालयामदये अनेक दिवसांपासून अनेक दलाल कार्यरत आहेत त्याच्या कडून वदुय्यम निबंधक यांकडून खरेदी-विक्री च्या तांत्रिक बाबींची भीती दाखवून हजारो रुपयांची मागणी केली जाते व त्यानंतरच दस्त हातात घेतले जातात लेखनिक एक दस्त लिहण्याचे 2ते5 हजार रुपये घेतात त्यामुळे दररोज होणार्‍या खरेदी-विक्री व बँकेच्या गहाण  खरेदी  खतामागे हजारो रुपयांची लूट होत आहे तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात असलेले लर्लीींं बंद असतात  व तेथे संपूर्ण कार्यालयात व परिसरात लर्लीींं कॅमेरे बवावेत अशी मागणी संभाजी ब्रिगेड कडून या पूर्वी करण्यात आली होती, तसेच या कार्यालयातील कर्मचारी व दलाल यामधील फरक जनतेच्या लक्षात येत नाही त्यामुळे सर्व कर्मचार्‍यांना ओळखपत्र असणे सक्तीचे करावे, टोकण नंबरसाठी असणारा डिस्प्ले तातडीने दुरुस्त करण्यात यावा व शेतकर्‍यां ऐवजी दलांना प्राधान्य देण्यात येऊ नये त्याच बरोबर स्कॅनिंग मशीनची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी शेतकर्‍यांसाठी अभ्यागत कक्षामध्ये बसण्याची व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी ,तसेच स्कॅनिंग ऑपरेटर व इतर कर्मचारी बेकायदेशीरपणे पैसे मागतात ते बंद व्हावेत यासाठी संभाजी ब्रिगेड कडून वारंवार पाठपुरावा कऱण्यात येत होता मात्र दुय्यम निबंधक कार्यालयाकडून थातुरमातुर उत्तरे देऊन टाळाटाळ केली जात होती, या सर्व प्रकारच्या विरोधात संभाजी ब्रिगेड कडून या दलाल व भ्रष्ट अधिकार्‍यांच्या विरोधात निषेध स्वरूप प्रतिकात्मक भिक मागो
आंदोलन करण्यात आले या पूर्वी श्रीगोंदा शहरातून जनजागृती करण्यासाठी सर्वत्र फिरून भीक गोळा करण्यात आली  त्यामुळे संपूर्ण शहरात व बाजारात या आंदोलनाची चर्चा झाली या वेळी संभाजी ब्रिगेड चे  कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.