Breaking News

वडिल-मुलीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे, दि. 24 - वडिल व मुलीने आत्महत्या केल्याची घटना पिसोळी येथे 4 मे 2017 रोजी घडली होती. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आत्महत्या केलेल्या  व्यक्तीच्या पत्नीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 
किरण देवेंद्र पाटील(62) व नियती देवेंद्र पाटील(17, दोघेही रा.किंगस्टन एलिशीया सोसायटी, पिसोळी, ता.हवेली) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.  याप्रकरणी किरण पाटील यांच्या पत्नीविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण व त्यांच्या पत्नीमध्ये आर्थिक कारणावरुन वाद होते. हे वाद वाढत गेल्यावर त्यांच्या पत्नीने त्यांच्या विरुध्द कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.  हा गुन्हा दाखल झाल्यापासून किरण यांची मानसिक परिस्थिती अस्थिर झाली होती. यामुळे नैराश्यातून त्यांनी मुलीसह आत्महत्या केली. त्यांची पत्नी पश्‍चिरम मुंबईत  बांद्रा येथे रहाते. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक व्हि.पी.वळवी तपास करत आहेत.