Breaking News

कलालवाडी दलीत वस्तीत तात्काळ पाणी पुरवठा करा

शिवसंग्रामची मागणी, अन्यथा पंचायत समितीवर घागर मोर्चा

बुलडाणा, दि. 05 - देऊळगांव राजा तालुक्यातिल भिवगाव-जुमडा गट ग्राम पंचायत मधील कलालवाडी या दलित वस्तीत 15 दिवसात कायम स्वरूपी उपाय योजना करुण तात्काळ पाणी पुरवठा करण्यात यावा आशा मागनीचे निवेदन आज शिवसंग्राम संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकरी आशीष पवार यांना दिले. पंधरा दिवसात पाणी पुरवठा न केल्यास शिवसंग्राम संघटनेच्या वतीने पंचायत समिति कार्यालया वर घागरमोर्चा काढण्यात येईल असा इशारा सदर निवेदनाद्वारे देण्यात आला.
देऊळगांव राजा तालुक्यामध्ये भिवगाव-जुमडा ही गट ग्रामपंचायत असुन तेथे 2 की.मी. अंतरावर 80 ते 90 लोकसंख्या असलेली कलालवाडी दलित वस्ती आहे. या दलित वस्तीत ग्राम पंचायत मार्फ़त पिण्याच्या पाण्यासाठी कायम स्वरूपी उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे सदर वस्तितील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. शिवाय तेथील नागरी ग्राम पंचायत ची घर पट्टी नियमित भरत आले आहे. वस्तितील नागरिकांनी अनेक वेळा सरपंच व ग्रामसेवक नेवले मॉडम यांच्या कड़े पाणी पुरवठा करण्यासाठी मागणी केली. तसेच सदर पाणी प्रश्‍न वार्षिक आम सभेत देखील मांडण्यात आला होता. त्यावेळी आम सभा अध्यक्ष यांनी कायम स्वरूपी उपाय योजना करुण तात्काळ पाणी पुरवठा करा असे निर्देश सम्बंधित ग्रामसेवक व अधिकारी यांना दिले होते. परंतु सदर ग्रामसेवक व अधिकारी यांनी पाण्यासाठी कोणतीही उपाय योजना केली नाही. त्यामुळे आज शिवसंग्राम संघटनेच्या वतीने गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनत नमूद आहे की कलालवाडी येथील नागरिकांना पाण्यासाठी वन-वन भटकावे लागत आहे. महिलांना दूर अंतरा वरुन हांड्याने पाणी आणावे लागत असल्याने खुप त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामसेवक नवले मॅडम व सरपंच हे कलाल वाडी दलित वस्ती असल्या कारणाने हेतुपुरस्कर पाण्या सारख्या समस्या कडे दुर्लक्ष करत आहे. स्वतंत्र मिळूनही भोगाव्या लागतात मरण यातना या म्हणी प्रमाणे तेथील नागरिकांवर ग्रामसेवक व सरपंच एक प्रकारचा अन्याय करत आहे.त्यामुळे गट विकास अधिकारी यांनी या समस्या कडे लक्ष्य देऊन पंधरा दिवसात कायम स्वरूपी उपाय योजना करुण कलाल वाडी या दलित वस्तित तात्काळ पाणी पुरवठा करण्यात यावा, अन्यथा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने पंचायत समिति कार्यालयावर घागरमोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी शिवसंग्राम तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, तालुका संघटक जाहिर खान पठाण, भानुदास नाडे, बालाजी खांडेभराड, बबन निकाळजे, रतन निकाळजे, रामदास निकाळजे यांच्या सह संघटनेचे कार्यकर्ते हजर होते.