Breaking News

नेट उत्तरपत्रिका घोटाळ्याप्रकरणी ’सीबीएसई’च्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली, दि. 28 - राष्ट्रीय पात्रता परिक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संचालकांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला आहे.
या वर्षी घेण्यात आलेल्या या परिक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यासाठी करारबद्ध केलेल्या व्हीनस डिजिटल या खाजगी कंपनीने अद्यापही हे काम पूर्ण केलेले नाही. तसेच या कामासाठी एक कोटी रुपये या कंपनीच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. या प्रकरणी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे संचालक अंतरिक्ष जोहरी, व्हीनस डिजिटलचे प्रतिनिधी कपिल सूरमा आणि अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणारी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये 22 जानेवारी रोजी देशभरातील 18 शहरातील 412 केंद्रांवर राष्ट्रीय पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. या कंपनीला करारबद्ध करताना कोणतीही निविदा काढण्यात आलेली नसल्याचेही तपासात उघड झाले आहे.