छत्रपतींची प्रतिष्ठा जपायची आहे : रितेश देशमुख
मुंबई, दि. 01 - मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख हा छत्रपती शिवाजी महाराजांवर भव्य-दिव्य सिनेमाची निर्मिती करणार आहे. हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वकांक्षी सिनेमा आहे, असं रितेश देशमुख म्हणाला.
सिनेमा करताना छत्रपती शिवरायांबद्दल प्रेक्षकांची जी काही भावना आहे, ती संवेदनशीलपणे हाताळण्याकडे लक्ष असले. तसंच शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा कायम ठेवणं हे मुख्य ध्येय असेल, असं रितेश देशमुखने नमूद केलं. हा सिनेमा अशा महान व्यक्तीवर आहे, ज्यांच्यावर केवळ महाराष्ट्रानेच नाही तर संपूर्ण देशाने जीव ओवाळून टाकला आहे. छत्रपती शिवाजी हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वकांक्षी सिनेमा आहे, असं रितेश म्हणाला. छत्रपती शिवरायांवरील या मराठी सिनेमाचं बजेट 200 कोटींपेक्षा जास्त असेल, असं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर रितेशचा दिग्दर्शक मित्र राम गोपाल वर्मानेही छत्रपती शिवाजी या सिनेमाचं बजेट 225 कोटी असेल असं ट्विट केलं होतं. त्याबाबत बोलताना रितेश म्हणाला, सध्या तरी सिनेमाचा स्क्रीनप्ले/पटकथा निश्चित झाली आहे. आता सिनेमाचं प्री प्रॉडक्शनचं काम सुरु होईल. त्यानंतर सिनेमाचं बजेट ठरवलं जाईल.