मनपाची इंटरनेट सेवा खंडित झाल्याने नागरिकांना नाहक त्रास
नवी मुंबई, दि. 12 - महापालिकेची इंटरनेट सेवा खंडित झाल्याने शहरातील नागरिकांना आज नाहक त्रास सोसावा लागला. विविध कर भरणा करण्यासाठी व पायाभूत सुविधांसाठी विभाग कार्यालयांत आलेल्या अनेक नागरिकांना माघारी परतावे लागले.
आरकॉम कंपनीमार्फत महापालिकेला इंटरनेटची सेवा पुरविली जात आहे. महापालिकेचे सीबीडी येथील मुख्यालय व शहरातील आठ विभाग कार्यालये व अन्य कार्यालये लीज लाईनेने जोडण्यात आली आहेत. 2 एमबीपीस स्पीड असलेली ही सेवा विभाग कार्यालयांना देण्यात आली आहे. सदर सेवा कोणत्याही कारणामुळे खंडित झाल्यास अर्ध्या तासात ती पुन्हा सुरु करण्याची अट सदर कंपनीच्या करारात आहे. सीबीडी येथील मुख्यालयासमोर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे रस्ता रुंदीकरण व उड्डाणपुल बनविण्यासाठी खोदकाम सुरु होते. काल रात्री या खोदकामात आरकॉम कंपनीची फायबर ऑप्टीक केबल तुटली. त्यामुळे रात्रीपासूनच मुख्यालय व विभाग कार्यालय यांना जोडणारी लिज लाईन इंटरनेट सेवा खंडित झाली होती. ही माहिती मिळताच सदर कंपनीद्वारे केबल दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले, मात्र सकाळपर्यंत हे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे सकाळपासूनच सर्व विभाग कार्यालयांतील इंटरनेट सेवा बंद असल्याने नागरिकांच्या जन्म-मृत्यू दाखल्यापासून अन्य सुविधांच्या परवानग्या देण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. सीएफसीचे कर्मचारी तर हातावर हात ठेऊन बसले होते. त्याच प्रमाणे मालमत्ता कर, पाणीपट्टी देयक भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही याचा चांगलाच फटका बसला. त्यामुळे सर्वच विभाग कार्यालयांतील कामकाज थंडावले होते. दरम्यान दुपारी साडेतीन नंतर ही सेवा सुरळीत चालू झाली,तरी सकाळ पासून सुस्तावलेल्या कर्मचा-यांना आता दुपारनंतर काम करण्याचा मूड न राहिल्यामुळे काहींनी पाच वाजेपर्यंतही नेट बंद असल्याची थाप मारून सुट्टीची मजा घेतली. या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांना विचारणा केली असता त्यांनी संबंधित ठेकेदाराने वेळेत इंटरनेट सेवा सुरळीत न केल्याबद्दल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.