Breaking News

बिहार सरकारने शहिदाच्या कुटुंबियांना दिलेला धनादेश बाऊन्स

पाटणा, दि. 11 - सुकमा हल्ल्यात शहिद झालेला जवान रंजर यांच्या पत्नी सविता देवी यांना राज्य सरकारने दिलेला पाच लाख रुपयांचा धनादेश वटला नाही.  त्यामुळे शहिदाच्या कुटुंबियांना नाहक अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.
शासकीय आर्थिक मदतीचा धनादेश सविता देवी यांना स्टेट बँकेच्या जमुई शाखेकडून मिळाला होता. त्यानंतर त्यांनी तो धनादेश एचडीएफसी बँकेच्या शेखपुरा शाखेत  जमा केला. तो धनादेश वटण्याऐवजी जमुई, पाटणा व नोएडा येथील शाखांमध्ये फिरत राहिला. पुढे बँकेच्या नोएडा शाखेत शेखपुरा शाखेचे माजी उपव्यवस्थापक  चंद्रशेखर सिंग यांची स्वाक्षरी नोंद होती. मात्र सध्या त्या जागी दिनेश कुमार कार्यरत आहेत. या गोंधळामुळे बँक प्रशासनाने धनादेश वटवण्यास नकार दिला.
त्यावर धनादेशावरील स्वाक्षरीत काही अडचणी होत्या. मात्र त्या दूर करण्यात आल्या आहेत. आता सविता देवी यांनी धनादेश जमा केल्यास त्यांना रक्कम प्राप्त होईल,  असे शेखपुरा शाखेचे उपव्यवस्थापक दिनेश कुमार यांनी सांगितले.