राज्यात मान्सून यंदा वेळेवर, येत्या पाच दिवसात अंदमानात!
पुणे, दि. 11 - लवकरच मान्सूनचं अंदमानात आगमन होणार आहे. पुणे वेधशाळेने ही माहिती दिली आहे. नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अंदमानात दाखल होण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे 15 मेच्या आसपास मान्सून दक्षिण अंदमानात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. मान्सून दक्षिण अंदमानात दाखल व्हायचा सर्वसाधारण काळ 15 मे दरम्यान असतो. गेले चार पाच दिवस परिस्थिती दक्षिण अंदमानात मान्सून पोहोचायला पोषक आहे.
त्यामुळे अंदमानात मान्सून वेळेत दाखल झाला तर पुढे केरळात आणि त्यानंतर महाराष्ट्रातही मान्सून वेळेत दाखल होईल. देशात यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान खात्याने 18 एप्रिल रोजी दिल्लीत पत्रकार परिषदेत यावर्षीच्या पावसाचा पहिला अंदाज वर्तवला होता. अल निनोचा इफेक्ट असला तरी त्याला नॉर्मलाईज करणारा आयओडी ( इंडियन ओशियन डायपोल) यावेळी कार्यरत असल्याने फार प्रभाव पडण्याची शक्यता नाही, असंही आयएमडीने स्पष्ट केलं होतं.