Breaking News

बाबरीप्रकरणी अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारतींवर आज आरोप निश्‍चित?

नवी दिल्ली, दि. 30 -  बाबरीप्रकरणी विशेष सीबीआयच्या न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर  जोशी आणि उमा भारती यांच्यावर आरोप निश्‍चितीची शक्यता आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तिन्ही नेत्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.  गेल्या महिन्यात 19 एप्रिल रोजी सीबीआयच्या याचिकेवरील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार आणि साध्वी  ऋतंभरा यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी आज यांच्यासह 13 जणांवर आरोप निश्‍चित होण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर, केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी राम मंदिर आंदोलनात सहभागी असल्याचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रीया दिली होती. तसेच बाबरी  विध्वंस प्रकरणाचा कसलाही कट रचला नव्हता, असंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने हा खटल्याची सुनावणी दोन वर्षात पूर्ण करण्याचा  आदेश दिले होते. त्यानुसार या प्रकरणाची दररोज सुनावणी होणार असून या दरम्यान न्यायाधीशांची बदली होणार नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. मशीद  पाडल्यानंतर लखनौ आणि फैजाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु आता या खटल्याची सुनावणी लखनऊ कोर्टात होणार आहे.