भिवंडीत कारमध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त, तिघांना अटक
भिवंडी, दि. 22 - भिवंडीजवळच्या अंबाडी नाका भागातून मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. जांभिवली भागात एका तवेरा गाडीमध्ये ही स्फोटकं सापडली. गाडीमध्ये सात गोण्या भरुन जिलेटिनच्या कांड्या, 1200 डिटोनेटर्स, अमोनियम नायट्रेटचे 70 डबे सापडले. या प्रकरणी शंकर आहेर, सागर आहेर आणि अजय गवई या तिघा जणांना अटक केली आहे. या तिघांनी ही स्फोटकं कशासाठी आणली होती, ती कुठं नेली जात होती, याबाबत तिघांची सखोल चौकशी सुरु आहे.