आई-वडील रूपी अमूल्य संपत्तीचा सांभाळ करा - प्रदीप पटवर्धन
पिंपरी, दि. 28 - आई-वडील ही मोठी संपत्ती असल्याने वृद्धापकाळात आई वडिलांना एकटे सोडू नका, असा सल्ला अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी दिला. दळवीनगर येथील अण्णासाहेब मगर सोशल स्पोर्टस् फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तिंना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगरसेविका सुमन पवळे, नगरसेवक शैलेश मोरे, चंद्रकांत नखाते, माजी नगरसेविका बेबीताई कुटे, बांधकाम व्यावसायिक जयनाथ काटे, बाळासाहेब गव्हाणे, फाऊंडेशनचे अध्यक्ष गुलाब बिरदवडे, कार्याध्यक्ष रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब लांडगे (जीवनगौरव), जगन्नाथ काटे (पिंपरी चिंचवड भूषण), बांधकाम व्यवसायातील उत्कृष्ट भागीदारी बद्दल मकरंद पांडे व नितीन धिमधिमे यांना उत्कृष्ट पार्टनर पुरस्कार तसेच शैक्षणिक क्षेत्रात योगदानाबद्दल डॉ. डी.एल इंगोले यांना गुरुवर्य पुरस्कार देवून सन्मानित केले. तसेच अन्य क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करणार्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.