Breaking News

उत्तराखंडमध्ये अडकलेले सर्व पर्यटक सुखरूप - मुख्यमंत्री रावत

डेहराडून, दि. 21 - उत्तराखंडमधील बद्रीनाथ मार्गावर विष्णुप्रयाग येथे झालेल्या भूस्खलनामुळे अडकलेले सर्व पर्यटक सुखरुप आहेत, असे मुख्यमंत्री त्रिवेंद्र  सिंग रावत यांनी आज सांगितले. ढिगारा उपसण्याचे काम सुरु असून लवकरच रस्ता मोकळा केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
विष्णुप्रयाग येथे शुक्रवारी दरड कोसळल्यामुळे सुमारे 15 हजार पर्यटक अडकले होते. ही दरड जोशीमठापासून 8 किलोमीटर अंतरावर कोसळली आहे. त्यामुळे  बद्रीनाथच्या दिशेने जाणारा रस्ता बंद झाला होता. त्यामुळे प्रशासनाने भाविकांना रस्त्यातच रोखले आहे. ढिगारा हलवण्याचे काम पुर्ण झाले तर आज हा रस्ता खुला  केला जाईल असे सांगण्यात येत आहे.