आपलाच राष्ट्रपती निवडून आणण्याचा भाजप नेतृत्वाचा निर्धार
नवी दिल्ली, दि. 21 - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कार्यकाळात वाढ करण्याची विरोधी पक्षांची मागणी पूर्ण करून आपल्या पसंतीचा राष्ट्रपती निवडण्याची मिळालेली संधी गमवण्याचा भारतीय जनता पक्षाचा मानस नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. जुलै महिन्यात होणा-या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी विरोधी पक्षांकडून जोरदार प्रयत्न होण्याची शक्यता असली तरी आपण निवडलेला राष्ट्रपती राष्ट्रपती भवनात असणे हे भाजपसाठी अधिक महत्त्वाचे असणार आहे.
प्रणव मुखर्जींबद्दल आमच्या मनात आदर आहेच. परंतु तरीही आम्हाला विरोधकांचा हा पर्याय स्विकारण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. आम्हाला जर आमच्या निवडीचा राष्ट्रपती मिळवण्याचा अधिकार असेल तर आम्ही विरोधी पक्षाचा प्रस्ताव का स्विकारावा, असे मत एका वरिष्ठ भाजप नेत्याने व्यक्त केले.
संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांनी पहिल्यांदा मुखर्जी यांनाच पुन्हा राष्ट्रपती करावे, अशी मागणी केली होती. भाजपनेच पुढाकार घेऊन प्रणव मुखर्जी यांच्या कार्यकाळात वाढ करण्यासाठी आमच्याशी चर्चा केली तर ते योग्य ठरेल, असे नितीश कुमार म्हणाले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली तेव्हा त्यांनीही याबाबत चर्चा केली. मुखर्जी यांची पुन्हा निवड होणार असेल तर आमचा त्यांना पाठिंबा असेल, असे संकेत काँग्रेसकडून देण्यात आले आहेत. विरोधी पक्षांनी सर्वसमावेशक उमेदवार शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तशी व्यक्ती न मिळाल्याने पराभवाच्या भीतीने ते आता पुन्हा प्रणव मुखर्जी यांनाच कार्यकाळ वाढवून देण्याची मागणी करत असल्याचे भाजप नेत्यांकडून सांगण्यात आले .