डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला पण हिंदूंबद्दल कटुत्व ठेवले नाही - रामदास आठवले
पुणे, दि. 12 - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदु धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धम्माचा स्वीकार केला. मात्र हिंदूंबद्दल कधीही कटुत्व भावना ठेवली नाही तर हिंदूंच्या हितासाठी हिंदू कोड बिल लिहिले. ते संमत होत नसल्याचे लक्षात येताच तत्कालीन नेहरु सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळातून केंद्रीय कायदा मंत्रीपदाचा राजीनामा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. त्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बुद्धविहाराचे उद्घाटन नुकतेच झाले. यावेळी कुलगुरु वासुदेव गाडे उपमहापौर नवनाथ कांबळे भदंत सुदर्शन नगरसेविका सुनीता परशुराम वाडेकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा भवन इही उद्घाटन आठवलेंच्या हस्ते झाले. भारत देशाची वाट लावायला आलेल्यांची वाट लावते असे भारताचे संविधान आहे. देशात विविधता आहे संविधानामुळे देश एकसंघ आहे फुटू शकत नाही. डॉ. आंबेडकरांनी आम्हाला बुद्धांची भक्ती दिली. संघटनेची शक्ती दिली. शिक्षणाची युक्ती आणि समतेच्या विचाराने मानवमुक्ती दिली, असे आठवले म्हणाले.