पंतप्रधानांच्या सोयीनुसार कोच्ची मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन; केरळ सरकारची माघार
तिरुवनंतपुरम, दि. 21 - भारतीय जनता पक्षाकडून केल्या गेलेल्या टीकेनंतर आता केरळ सरकारने कोच्ची मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता आम्ही पंतप्रधान मोदी यांच्या वेळेनुसार उद्घाटनाची तारीख निश्चित करु असे केरळ सरकारकडून सांगण्यात आले आहे.केरळ राज्य सरकारने 30 मी रोजी कोच्ची मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येईल असे घोषित केले होते. या सुमारास पंतप्रधान मोदी हे विदेश दौर्यावर जाणार आहेत.
पंतप्रधान मोदी हे कार्यक्रमाला उपस्थित राहू नये म्हणून केरळ सरकारने जाणीवपुर्वक ही तारीख निश्चित केली होती, असा आरोप भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला होता. केरळ सरकारकडून निश्चित करण्यात आलेली तारीख आणि पंतप्रधान मोदी यांचा युरोप दौरा त्याच कालावधीत आहे, असे भारतीय जनतापक्षाचे केरळमधील अध्यक्ष कुम्मनम राजशेखरन यांनी नमूद केले.
कोच्ची मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या तारखेसंबंधी काही तरी गैरसमज झाला आहे. आम्ही अजून उद्घाटनाची तारीख ठरवलेली नाही, असे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले. आता पंतप्रधान मोदी हे जी तारीख देतील त्या नुसार उद्धाटन केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.