सुकमा हल्ला घडवणार्या दहा संशयित नक्षलवाद्यांना अटक
सुकमा, दि, 04 - छत्तीसगडमधील सुकमा हल्ल्याप्रकरणी दहा संशयित नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. हल्ल्यानंतर सीआरपीएफने केलेली ही मोठी कारवाई आहे. सीआरपीएफ जवानांनी राज्य पोलिसांच्या मदतीने सुकमा, चिकपाल आणि फूलबाग्री गावात संयुक्तपणे ही कारवाई केली. नक्षलवाद्यांवर आणखी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अटक केलेल्यांमध्ये चार जण हे स्थानिक लष्करी कमांडर आहेत. तर त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे. हुंगा मदकामी (18 वर्ष), पुजरा (वय 42 वर्ष) आणि आयाती अशी अटक केलेल्या संशयित नक्षलवाद्यांची नावं आहेत. 24 एप्रिल रोजी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 25 सीआरपीएफ जवान शहीद झाले तर सहा जण जखमी झाले होते. या हल्ल्यात चारही संशयितांचा हात असल्याचा आरोपातून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आज सुकमा दौर्यावर आहेत.