विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताच्या हालचाली
नवी दिल्ली, दि, 04 - कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारतानं हालचाली सुरु केल्या आहेत. भारत आणि इंग्लंडमध्ये आज सचिव स्तरावर प्रत्यार्पणाबाबत चर्चा सुरु झाली आहे. भारतातर्फे केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी तर इंग्लंडच्या वतीनं पात्सी विल्किन्सन यांच्यात ही चर्चा होत आहे. यादरम्यान विजय मल्ल्यासह 10 फरार आरोपींना भारताच्या स्वाधीन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
61 वर्षीय विजय मल्ल्या गेल्या वर्षभरापासून इंग्लंडमध्ये वास्तव्य करतोय. भारताच्या मागणीनंतर मागील आठवड्यात त्याला स्कॉटलंड पोलिसांनी अटकही केली होती. पण, अवघ्या काही तासातच मल्ल्याची सुटका झाली. त्यामुळं आता या बैठकीत मल्ल्यासारख्या बड्या धेंडांच्या मुसक्या आवळण्याबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. विजय मल्ल्याने स्टेट बँक ऑफ इंडियासह 17 बँकांचं जवळपास 9 हजार कोटी रुपयांचं कर्ज थकवलं आहे.