आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती
नवी दिल्ली, दि. 10 - भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटक झालेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानने सुनावलेल्या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. पाकिस्तानने भारताला कोणतीही माहिती न देता बेकायदशीरपणे फाशीची शिक्षा सुनावली, असा दावा भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केला होता.
दरम्यान पाकिस्तानकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे पाकिस्तान सरकार यावर काय बोलतं, त्याकडे लक्ष सर्वांचं लागलं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानला आपली बाजू मांडावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय हा भारतासाठी मोठा विजय मानला जात आहे. कारण भारताने तब्बल 16 वेळा कुलभूषण जाधव यांच्याशी काऊन्सिलर अॅक्सेस देण्यासाठी विनंती केली होती. मात्र पाकिस्तानने ही मागणी फेटाळली. त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.