Breaking News

भारत पुन्हा पाकिस्तानला हरवेल - गांगुली

मुंबई, दि. 10 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताचा पहिला मुकाबला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. चार जूनला हा सामना रंगत आहे.   पाकिस्तानशी होणार्‍या या सामन्यात भारत पुन्हा बाजी मारेल अशी आशा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केली आहे. 50 तसेच 20 षटकांच्या वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड 11-0 असा राहिला आहे. पाकिस्तानला एकदाही भारताला हरवता आलेले नाही. तर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत पाकिस्तानविरुद्ध दोनदा जिंकला आहे. तर पाकिस्तानने एकदा भारताला हरवले आहे. त्यामुळे यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधीलही सलामीच्या सामन्यात भारत पुन्हा पाकिस्तानला हरवेल असा विश्‍वास गांगुलीने व्यक्त केला आहे.