Breaking News

झाडे, फुलांच्या बिया जमा करा सौ. तांबे यांचे संगमनेरकरांना आवाहन

संगमनेर, दि. 30 - पर्यावरणाचा र्‍हासाचे वृक्षतोड हे मुख्य कारण असल्याने पुन्हा वनराई उभी राहण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने एक सीड बँक स्थापन करुन निंबोळी व विविध फुले, फळे यांच्या बिया जमा कराव्यात व या पावसाळ्याात प्रत्येकाने जास्तीत जास्त झाडांचे रोपन करावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.  
वृक्षसंवर्धन व रोपन या विषयावर तालुक्यातील जनतेला व विद्यार्थ्यांना आवाहन करतांना सौ. तांबे म्हणाल्या, या उन्हाळ्यातील सुट्यांमध्ये आपल्या आजुबाजुला अनेक फळझाडे, वृक्ष्यांच्या बिया पडलेल्या असताना प्रत्येकाने त्या बिया गोळा करुन ठेवल्या पाहिजे. योग्यवेळी योग्य ठिकाणी रोपन केल्यास मोठ्या प्रमाणात वृक्षराई वाढेल. यासाठी प्रत्येकाने एक सीड बँक स्थापन करावी. यामध्ये फुरांची, निंबोळी, विविध फळे, झाडांच्या बिया वर्षभर जमा कराव्यात पावसाळ्यात शाळेत येता जातांना शेतावर, बांधावर मोकळ्या जागेत, जमिनीमध्ये टाकुन त्याचे संवर्धन करावे. यातून एक मनुष्य हजारो वृक्ष निर्माण करु शकतो.सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी मानवाच्या कल्याणासाठी व हरितसृष्टीसाठी दंडकारण्य अभियान ही पर्यावरणाची मोठी चळवळ सुरु केली. आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याने संपूर्ण देशाला पर्यावरण संवर्धनाचा नवा मंत्र दिला. यावर्षी 11 वे दंडकारण्य अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी मोठया प्रमाणावर बियांची आवश्यकता आहे. म्हणून या पावसाळ्यात प्रत्येक नागरिकाने जास्तीत जास्त वृक्षारोपन करावे. तसेच निंबोळी व विविध फुले, फळे यांच्या बिया गोळा करुन जवळील विद्यालयात किंवा सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी  साखर कारखान्याच्या दंडकारण्य विभाग समितीकडे या बिया जमा कराव्या असे आवाहन ही त्यांनी केले आहे.