’बेवॉच’नंतर प्रियांका आणखी दोन हॉलिवूड सिनेमात दिसणार!
मुंबई, दि. 01 - अभिनेत्री प्रियांका चोप्रा हॉलिवूडच्या पहिल्या वहिल्या बेवॉच या सिनेमात झळकल्यानंतर आणखी दोन सिनेमांमध्ये दिसणार असल्याची माहिती आहे. प्रियांकाचा बेवॉच सिनेमा भारतात अजून रिलीज होणार आहे. मात्र त्यापूर्वीच तिच्या हातात आणखी दोन हॉलिवूड सिनेमे असल्याचं वृत्त आहे.
‘ए किड लाईक जेक’ आणि ‘इजन्ट इट रोमँटिक’ या दोन सिनेमांमध्ये प्रियांका दिसणार असल्याची माहिती आहे. एका वेबसाईटच्या वृत्तानुसार प्रियांका जूनमध्ये ‘ए किड लाईक जेक’ या सिनेमाची शूटिंग सुरु करणार असून यानंतर क्वांटिको मालिका आणि ‘इजन्ट इट रोमँटिक’ या सिनेमांची शूटिंगही सुरु होणार आहे. प्रियांकाच्या क्वांटिको या मालिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी लोकप्रियता मिळवली आहे. प्रियांका सध्या बेवॉच सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा अमेरिकेत रिलीज झाला आहे.