आंदोलनाची धार, मुख्यमंत्री फरार
दि. 29, मे - आत्मविश्वास बळकट असलेला माणूस कुठल्याही आव्हानाला सामोरा जातो, प्रतिकुल परिस्थितीला अनुकुल बनवितो. ही लक्षणं उत्कृष्ट राज्यकर्त्याच्या अंगी असायलाच हवी. गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जाणवणारा हाच आत्मविश्वास अलिकडच्या काही दिवसात डळमळीत झाल्याची शंका नाशिक दौर्यातून निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी विविध चळवळीत काम करणारे शेकडो सामान्य जन शासकिय विश्राम गृहाच्या प्रांगणात माध्यान्हीचा सुर्य डोक्यावर घेऊन प्रतिक्षा करीत असतांना मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली पाठ नाशिककरांचा स्वाभीमान दुखावून गेली, सामान्यजनांच्या प्रामाणिक भावनांना मुख्यमंत्र्यांंनी दाखविलेल्या वाकुल्या नाशिककरांना आपला अवमान वाटत आहे,आणि म्हणून भेटीसाठी तिष्ठत असलेल्या अभ्यागतांचा संताप अनावर झाला आणि आंदोलनाची धार तिव्र झाल्यानेच मुख्यमंत्री घाबरून परस्पर फरार झाले असा निष्कर्ष नाशिककर काढीत आहेत.
लातुरला झालेल्या दुर्दैवी अपघातातून सुखरूप बचावल्या नंतर मुख्यमंञी पहिल्यांदाच नाशिक दौर्यावर येत असल्याने नाशिककरांमध्ये सहानुभुती निर्माण झाली होती. देवेंद्र फडणविस भाजपाचे सक्रीय आधारस्तंभ असले तरी महाराष्ट्राचे मुख्यमंञी म्हणून विविध राजकीय आणि सामाजिक विचारधारा असलेला सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या भेटीसाठी शासकीय विश्रामगृहाच्या आवारात जमा झाला होता.
या भेटीचे दोन प्रमुख उद्देश होते. पहिला उद्देश अर्थातच अपघातातून बचावल्यानंतर प्रथाम आपल्या शहरात आलेल्या मुख्यमंत्र्याविषयी सदिच्छा व्यक्त करणे. दुसरा उद्देश नेहमीप्रमाणे आपले पारंपारीक गार्हाणे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणे.
नियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंञी दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृहावर येणार ... या ठिकाणी भाजपाच्या नवनिर्वाचीत नगरसेवकांची शिकवणी मुख्यमंञी घेणार... म्हणजे ते या ठिकाणी हजेरी लावणार हे पक्कं ठरलेल. या आशेवर एक जून पासून संपावर जाण्याची हाक देणार्या किसान क्रांती मोर्चाच्या झेंड्याखाली एकवटलेला शेतकरी वर्ग, राज्यात दारूबंदी व्हावी म्हणून लढा देणार्या महाराष्ट्र राज्य दारू बंदी जनआंदोलन व छत्रपती युवा सेनेचे महिला पुरूष कार्यकर्ते, शेतकर्यांच्या प्रश्नांसोबत अपंगांच्या हक्कासाठी लढणार्या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते, समृध्दी महामार्गाला विरोध करणारे शेतकरी, वारकरी संघटना अशा वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते सुर्य आग ओकत असतानाही मुख्यमंत्र्यांची प्रतिक्षा करीत होते.इतकेच नाही तर पञकारांचे गार्हाणे ऐकण्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी पाच ते दहा मिनिटांचा वेळ आरक्षित केला होता. अशा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपाचे कार्यकर्ते आणि नगरसेवक आशाळभूतपणे महापालिकेकडून विश्रामगृहाकडे येणार्या रस्त्याकडे डोळे लावून बसले होते भर दुपारी जवळपास दोन तास तिष्ठत असलेल्या जनतेला भेटण्यात मुख्यमंत्र्यांनी कुठलेही स्वारस्य दाखविले नाही.विश्रामगृहावरील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून मुख्यमंत्री परस्पर निघून गेल्याचा सांगावा आला आणि सत्ताधार्यांचा हिरमोड अन् सत्तेबाहेरील सामान्य कार्यकर्त्यांचा प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला.दरम्यानच्या काळात समृध्दी महामार्गाच्या विरोधात असलेला असंतोष भगूरच्या कार्यक्रमात उफाळून येऊ नये म्हणून या कार्यक्रमाला शेतकरी वेशातील टोपीधारी नागरिकांना रोखले गेले, आंदोलनाचे नेतृत्व करणार्या नेत्यांना चर्चेला येण्याचे निमंत्रण देऊन स्थानबध्द केल्याच्या बातम्या पसरल्याने विश्राम गृहावर जमलेल्या मंडळीमध्ये असतोषाची धार वाढली.आणि मुख्यमंत्री जनतेला सामोरे जाऊ शकत नाहीत.आंदोलनाची धार वाढत असल्याचे पाहून मुख्यमंत्री फरार झाले अशा प्रतिक्रीया उमटू लागल्या.खरेतर, दोन दिवसापुर्वी झालेल्या अपघातानंतर अकरा कोटी वीस लाख जनतेच्या आशीर्वादाने सुखरूप आहे अशी प्रतिक्रीया देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भेटीसाठी तिष्ठत असलेल्या त्याच जनतेकडे पाठ फिरवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकच आहेत का? असा प्रश्न स्वाभाविकपणे जनतेच्या मनात येऊ शकतो. नाशिकच्या या अनुभवातून प्रसंगाला सामोरे जाण्याचे नैतिक धारिष्ट मुख्यमंञ्यांनी गमावले का? पुर्वी असलेला आत्मविश्वास हळूहळू कमी तर होत नाही ना? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.