Breaking News

पोस्टाचे व्यवहार आता ऑनलाईन

औरंगाबाद, दि. 22 - बदललेलं पोस्ट ऑफिस माझ्या डोळ्यासमोर आलं आणि त्यात झालेल्या बदलाचं वर्णनपण हे पोस्ट ऑफिस असू शकत नाही न बदलणं हा पोस्टाचा स्थायी भाव नावासकट आहे तसं पोस्ट ऑफिस रहायला हवं.
सुमारे 40 वर्षांपूर्वी पुलंनी पोस्ट खात्याचं वर्णन आपल्या खुमासदार शब्दात केलं होतं पण आता हेच चित्र बदलण्यासाठी पोस्ट खात्यानं कंबर कसली आहे आतापर्यंत आपल्या खाकी पोतडीतून सुख-दुःखाच्या वार्ता लोकांपर्यंत पोहोचवणारा पोस्टमन काका आता हायटेक होत आहे. पोस्टमनच्या सोबतीला आलं आहे पोस्टाचं नवं अ‍ॅप या अ‍ॅपद्वारे स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर, पार्सल, बल्क डिलिव्हरी आणि रजिस्टर पोस्ट तातडीने ग्राहकांच्या हाती पडणार आहे. शिवाय ज्याने ते पाठवलं आहे, त्यालाही पत्र डिलिव्हर झाल्याची माहिती तातडीने मिळणार आहे. ‘मी पोस्टमनना कधी हसताना पाहिलेलं नाही सदैव डिलिव्हरीच्या चिंतेत असलेल्याकडून हसणं वगैरे कशी अपेक्षा ठेवायची’ असंही पुलंनी म्हटलं होतं. पण या अ‍ॅपमुळे पोस्टमनच्या चेहर्‍यावर तजेला आला. कारण त्यांचं निम्मं काम कमी झालं आहे.