Breaking News

दहा रुपयाच्या नाण्यावर बंदी नाही, अफवांवर विश्‍वास ठेवू नका!

नाशिक, दि. 12 - नाशिकमध्ये 10 रुपयांच्या नाण्यावर अघोषित बंदी घालण्यात आली आहे. अनेक ठिकाणी व्यापार्‍यांकडून दहा रुपयाचं नाणं स्वीकारले जात नाही. विशेष म्हणजे बहुतेक ठिकाणी तसे सूचना फलकच लावण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, आता नाशिकच्या जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे की, दहा रुपयाच्या नाण्यावर बंदी नसून, कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नका. मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घालून अनेक दिवस उलटूनही त्याचा त्रास नागरिकांन सहन करावा लागतो आहे. आजही नाशिकमधील जवळपास 70 टक्के एटीएममध्ये पैसे शिल्लक नसल्याने अनेक नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतं.
एकंदरितच नोटाबंदीमुळे उद्भवलेली परिस्थिती कायम असताना आता एका नवीनच समस्येला नागरिकांना तोंड द्यावं लागतं आहे. नाशिकमध्ये दहा रुपयाच्या नाण्यावर अघोषित बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे तसे फलकच अनेक ठिकाणी लावलेले पाहायला मिळत आहेत.