Breaking News

लातूर एक्स्प्रेसचा वाद सुरुच, लातूर स्थानकावर रेलरोको

लातूर, दि. 10 - लातूर-मुंबई एक्स्प्रेस बिदरपर्यंत सोडण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध सुरुच आहे. लातूर रेल्वे स्थानकावर पंढरपूर निजामाबाद एक्स्प्रेससमोर रेलरोको करण्यात आला. रेल्वे बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि लातूरकरांनी हे आंदोलन पुकारलं. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
लातूर एक्स्प्रेस बिदरपर्यंत नेण्याचा निर्णय झाल्याने लातूरकरांनी त्याला विरोध केला आहे. या निर्णयामुळे लातूर एक्स्प्रेसचा फायदा उदगीर आणि बिदरच्या प्रवाशांना होणार आहे. पण उस्मानाबाद आणि लातूरच्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. दरम्यान याप्रकरणी मराठवाड्यातील नेत्यांनी काल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेटही घेतली. मात्र यावर कोणताही तोडगा निघाला नाही. मात्र सुरेश प्रभू यांनी लातूरकरांसाठी नव्या ट्रेनची घोषणा केली आहे.