खाशाबा जाधव युवा राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड
अहमदनगर, दि. 27 - कुस्ती ऑलंम्पिक पदक विजेते कै.खाशाबा जाधव तीसरी युवा (ज्युनिअर) फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन राज्यस्तरीय अजिंक्यद कुस्ती स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा तालीम संघाची निवड चाचणी वाडियापार्क क्रीडा संकुलात घेण्यात आली. या निवड चाचणी स्पर्धेत जिल्ह्यातील मल्लांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने तर वाशीम जिल्हा तालीम संघाच्या वतीने रविवार दि.28 मे ते मंगळवार दि.30 मे दरम्यान वाटाणे (जि.वाशीम) येथे होणार्या कै.खाशाबा जाधव युवा राज्यस्तरीय अजिंक्यद कुस्ती स्पर्धेसाठी जिल्ह्यातील पैलवानांची निवड चाचणी घेण्यात आली. अहमदनगर जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निवड चाचणी पार पडली. प्रारंभी जिल्हा तालिम संघाचे खजीनदार पै.नाना डोंगरे यांच्या हस्ते निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष पै.रामभाऊ लोंढे, उपाध्यक्ष रामभाऊ नळकांडे, गोरख खंडागळे उपस्थित होते. पंच म्हणून पै.हंगेश्वर धायगुडे, पै.गणेश जाधव, पै.मनोज शिंदे यांनी काम पाहिले. निवड झालेल्या संघाचे व्यवस्थापक म्हणून पै.नाना डोंगरे काम पाहत आहे.