Breaking News

रस्त्याचे काम त्वरीत करा - राष्ट्रवादीची मागणी

अहमदनगर, दि. 27 - पवित्र रमजान महिना सुरु होत असताना व पावसाळ्याच्या प्रारंभी मुकुंदनगर येथील टॉपअप पेट्रोल पंम्प ते राजनगर या नगरोत्थान  योजनेतील रखडलेले रस्त्याचे काम त्वरीत सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मनपा आयुक्त दिलीप गावडे यांना देवून चर्चा करण्यात  आली. अनेक महिन्यापासून काम बंद अवस्थेत असताना, मनपा प्रशासनाने आठ दिवसात सदर रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र अद्यापि काम  सुरु न झाल्याने सोमवारी स्थानिक नागरिकांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी  जिल्हा उपाध्यक्ष काजिम शेख, सोहेल सय्यद, नजीर शेख, समीर खान, अल्ताफ सय्यद, मोहसीन शेख, शाहरुख शेख, जावेद राजे, सलीम शेख, शहेबाज सय्यद,  इरफान शेख, अदनान सय्यद, अरफात शेख, जुबेर बागवान आदि उपस्थित होते.
मुकुंदनगर भागात नगरोत्थान योजनेतून मंजुर झालेला टॉपअप पेट्रोल पंम्प ते राजनगर या रस्त्याच्या कामास ठेकेदाराने सुरुवात केली. मात्र गेल्या कित्येक  महिन्यापासून सदर काम बंद अवस्थेत आहे. 15 दिवसापुर्वी स्थानिक नागरिकांनी महापालिकेत मोर्चा आनून सदर रस्त्याच्या परिस्थिती बाबत कल्पना दिली होती.  यावर मनपा प्रशासनाने आठ दिवसात सदर रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र 15 दिवस उलटून देखील सदर रस्त्याचे काम सुरु करण्यात न  आल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.