सातारा बसस्थानकात आरक्षणासाठी प्रवाशांच्या रांगा
सातारा, दि. 27 (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा बसस्थानकातील तिकीट आरक्षण केंद्रावर प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागत असून उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आणखी तिकीट कॉउंटर सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
सातारा बसस्थानक हे मध्यवर्ती बसस्थानक असल्याने या बसस्थानकावर प्रवाशांची नेहमी गर्दी असते. बसस्थानकात मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, गोवा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सोलापूर, पंढरपूर, लातूर यासह अन्य ठिकाणी बसेस ये -जा करतात. दिवसभरात विविध आगाराच्या बसेसच्या सुमारे 1 हजार 800 हून अधिक फेर्या होतात. सध्या लग्नसराई व सुट्टीचे दिवस आहे. एसटीचा प्रवास सुखकर प्रवास त्यामुळे प्रवासी वर्ग एसटीनेच प्रवास करत आहेत. लांब पल्ल्याच्या मार्गावरील बसचे आरक्षण करण्यासाठी सातारा बसस्थानकातील आरक्षण केंद्रावर प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. सुट्टीसाठी गावी आलेले चाकरमानी पुणे व मुंबईकडे जाण्यासाठी आगावू आरक्षण करत आहेत. रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत आरक्षणासाठी प्रवाशांच्या रांगा कायम लागत आहेत. सध्या एकाच खिडकीवरून आरक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असल्याने गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी सातारा आगारातील अधिकार्यांनी उन्हाळी हंगाम व प्रवाशांची गर्दी पाहता आणखी आरक्षण काऊंटर्स सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.