Breaking News

जाधव यांना भेटू देण्याची परवानगी न्यायालयाने दिलेली नाही - अझीझ

इस्लामाबाद, दि. 21 - कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव याच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती दिली आहे. मात्र, भारताच्या  पाकिस्तानातील राजनैतिक अधिका-यांना जाधव यांनााची परवानगी देण्याचे आदेश नाहीत, असे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनी आज सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय  न्यायालयात पाकिस्तानचा पराभव झाला असेही म्हणता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वेळेची मर्यादा होती. मात्र, यापुढे आम्ही आमची कायदेशीर बाजू बळकट करणार आहोत. न्यायालयाने केवळ जाधव यांच्या फाशीच्या निर्णयावर स्थगिती दिली  असून आपली बाजू न्यायालयासमोर मांडण्यासाठी पाकिस्तानकडे केवळ 5 दिवस होते आणि खावेर कुरैशी यांना याप्रकरणाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय  सर्वानुमते घेण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले.