हिमाचल प्रदेशमधील चंबामध्ये भूकंपाचे पुन्हा धक्के
नवी दिल्ली, दि. 21 - हिमाचल प्रदेशमधील चंबा यवारी सकाळी 9 वाजता भूकंपाचे झटके जाणवले. हा भूकंप 3.6 रिश्टर स्केलवर इतक्या तीव्रतेचा होता. यात जीवित वा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही.
3.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप शनिवारी सकाळी 9.11 मिनिटांनी झाला. यापूर्वी शुक्रवारीही चंबा येथे कमी तीव्रतेचे दोन भूकंप झाले. त्यातील पहिला भूकंप दुपारी झाला, तो 2.8 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. तर दुसरा सध्याकाळी झालेला भूकंप 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता, अशी माहिती हवामान खात्याचे संचालक मनमोहन सिंग यांनी दिली.