Breaking News

तीळगंगा नदीच्या पात्रातील गाळ काढण्यास प्रारंभ

कोरेगाव, दि. 27 (प्रतिनिधी) : कोरेगाव-आसरे रस्त्यावर असलेल्या तीळगंगा नदीच्या पत्रातील ब्रिटीशकालीन बंधार्‍यातील गाळ काढण्याचा व खोलीकरण करण्याचा  प्रारंभ सोमवारी झाला.
हे काम जलयुक्त शिवार, जनकल्याण समिती तसेच कोरेगाव, कुमठे नागरिकांच्या लोकसहभागातून होत आहे. कामाचा शुभारंभ प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांच्या  हस्ते, कोरेगाव पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे, कोरेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, भाजपचे भानुदास बर्गे, जनकल्याण समितीचे अध्यक्ष  विजयराव पंडीत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. ब्रिटीशकालीन बंधार्‍यात अनेक वर्षे गाळ साठून राहिला आहे. तीळगंगा नदीच्या किनार्‍याला लागून कोरेगाव, कुमठे  परिसरातील शेतकर्‍यांच्या शेत जमिनी आहेत. गाळ काढल्यानंतर याचा फायदा परिसरातील शेतकर्‍यांना होईल, असे मत प्रांताधिकारी खराडे, राजाभाऊ जगदाळे,  राजाभाऊ बर्गे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी कोरेगाव तसेच कुमठे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.