Breaking News

सातार्‍यात स्वातंव्यवीर सावरकर भक्तांचा मेळावा

सातारा, दि. 27 (प्रतिनिधी) : अखिल भारत हिंदू महासभा सातारा जिल्हा यांच्यावतीने स्वा. विनायक दामोदर सावरकर दि. 28 रोजी सकाळी 11 वाजता ज्येष्ठ  नागरिक सामाजिक सभागृह, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उद्यान, राजवाडा यथे स्वातंव्यवीर सावरकर भक्तांचा मेळावा आयोजित केला आहे.
मेळाव्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदे भूषविणार आहेत. प्रसिध्द चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते विलासराव रकटे यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेश  हिंदू महासभेचे उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद गांधी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
यावेळी सामजभूषण पुरस्कार कै. महावीर बोहरा यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल दिला जाणारा आहे. उद्योगभूषण पुरस्कार प्रशांत शिंदे यांनी बांधकाम व्यवसायात  केलेल्या कामाबद्दल दिला जाणारा आहे. एकंबे येथील गोरख चव्हाण यांना सहकाराबरोबरच उद्योग क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल सहकार भूषण पुरस्कार दिला जाणार  आहे. शिल्पकार नंदकुमार इंगळे यांना कलाभूषण पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या भक्त मेळाव्यास सर्वानी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष दत्ता  सणस यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनराज जगताप, उमेश गांधी, प्रमिला कुलकर्णी, रमेश ओसवाल, बंटी जगताप, दयानंद दिघे प्रयत्नशील  आहेत.