Breaking News

राष्ट्रवादी विचारांची लढाई या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना - डॉ. जयंत कुलकर्णी

अहमदनगर, दि. 27 - वनवासी कल्याण आश्रम नगर शाखेच्या वतीने माउली सभागृहात आयोजित कै. ग.म. मुळे स्मृती व्याख्यानमालेत    हैद्राबाद येथील  विज्ञानभारती  आभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जयंत कुलकर्णी यांचे राष्ट्रवादी विचारांची लढाई या विषयावर व्याख्यान  झाले. यावेळी डॉ. सी.डी. मिश्रा.,  टीजेएसबी बेंकेचे प्रबंधक श्री.गुरुप्रसाद बर्वे ,वनवासी कल्याण आश्रम नगर जिल्हाध्यक्ष मेघ:शाम बत्तीन, शहराध्यक्ष प्रशांत मोहोळे  आदी यावेळी उपस्थित होते
यावेळी कुलकर्णी म्हणाले की भारतावर हजारो आक्रमणे झाली त्यात परकीयांची संस्कृती व परंपरा रुजविण्याचा प्रयत्न झाला. स्वातंत्र्यानंतरही सत्तेसाठी देशाला  विविध विचार प्रवाहात  गुंतवून ठेऊन विशिष्ठ समाजाना विकासासाठी महत्व दिले गेले. आज  देशाच्या विकासासाठी हजारो वर्षांची परंपरा व संस्कृतीचा वारसा  असलेल्या भारतात सर्वांना समान अधिकाराचा विचार व्हावा तसे झाले तर राष्ट्रवादाची वैचारिक लढाईला आर्थ प्राप्त होईल .असे  डॉ.जयंत कुलकर्णी यांन म्हणाले.
यावेळी कुलकर्णी म्हणाले की, तुझा का माझा हा  राष्ट्रवाद विचार घातकच. समाजाला संतुलित राखण्याचे काम आजपर्यंत साहित्यिक व महापुरुषांनी केले. आज मात्र  परिस्थिती बदलली असून स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीची विधाने व आरोप करून समाजाचे अखंडत्व खंडित करून अराजकता पसरविण्याच्या विचारधारा देशात वाढत  आहेत. विश्‍व हे कुटुंब मानणार्‍या आपल्या देशातील विचाराचा आपण सगळे सन्मान करीत असलो तरी देशाच्या सुरक्षेसाठी सिमांचे महत्वही तितकेच महत्वाचे आहे.  अशा परिस्थितीत सैनिकांचे व न्यायव्यवस्थेचे मनोबल खच्ची करणार्‍या विचार प्रवाहांचा धोका वाढत आहे. त्याला वेळीच रोखले गेले पाहिजे. देशाची परंपरा  नाकारणारा, भांडवलशाही, गुलामगिरी, मार्क्सवाद अशा विविध विचारांच्या प्रवाहातून राष्ट्रवादी विचार म्हणजे नेमके काय? हा प्रश्‍न सामान्यांना नेहमीच सतावतो.