Breaking News

विविध मागण्यांसाठी शेतकरी 1 जूनपासून संपावर

जळगाव, दि. 28 - शेतकर्यांची सरसकट अल्प, मध्यम मुदत कर्जासह सर्व कर्जातून मुक्ती करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी 1 जूनपासून संपावर  जाणार आहेत. दरम्यान, जळगाव तालुका कृती समितीतर्फे आज तहसिलदारांना शेतकर्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चातून आधारीत 50 टक्के नफा मिळावा, शेतीसाठी विविध दरवाढ करुन व खोटी  बिले पाठवून शेतकर्यांचे हाल करण्यापेक्षा ते सरसकट करुन मोफत वीज देण्यात यावी, ठिबक व तुषार संचासाठी 100 टक्के अनुदान द्यावे, शेतकर्यांचे 60 वर्षांनंतर  पेन्शन लागू करण्यात यावे, दुधाला किमान 50 रु.लिटर भाव द्यावा, खताची सबसिडी पूर्वीप्रमाणे सुरु करण्यात यावी, यासह इतर मागण्यांचा समावेश आहे. यावेळी  शेतकर्यांच्या शिष्टमंडळाने तहसिलदारांशी चर्चा केली. प्रा.डी.डी. बच्छाव, डॉ.राधेश्याम चौधरी, डिगंबर चौधरी, ज्ञानदेव चौधरी, सत्वसिंग पाटील, अरुण पाटील,  मनोज चौधरी, पुरुषोत्तम पाटील, प्रेमचंद चौधरी, सुभाष पाटील, ऋषिकेश चौधरी, भरत कोळी, किशोर चौधरी, प्रमोद महाजन, जगदीश पाटील, सचिन पाटील,  रमेश चौधरी, दीपक पाटील आदी उपस्थित होते.