गोपीनाथ गडावर कार्यक्रमाची तयारी सुरू
परळी, दि. 30 - लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त येत्या 3 जून रोजी होणार्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या गोपीनाथ गडावर सुरू असून भव्य मंडप उभारणीचे काम वेगाने होत आहे. मुख्यमंञी व रेल्वेमंत्री हे दोघेही या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहणार असल्याने त्यादृष्टीने तयारी करण्यात येत आहे.
येत्या शनिवारी दुपारी 12.30 वा. होणार्या या कार्यक्रमासाठी गोपीनाथ गडावर दीडशे बाय अडीचशे फुट आकाराचा भव्य वॉटर प्रुफ मंडप उभारण्यात येत आहे. राज्याच्या काना कोपर्यातून अनेक कार्यकर्ते तसेच खासदार, आमदार, भाजपचे पदाधिकारी मोठया संख्येने यादिवशी गडावर दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन तशी व्यवस्था येत आहे. आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पार्किंग, महाप्रसाद आदींचे नियोजन करण्यात येत असून कार्यकर्त्यांना याची जबाबदारी देण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी 10 वाजता ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे किर्तन आणि त्यानंतर दुपारी 12.30 मुख्य कार्यक्रमास सुरुवात होणार असून त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम नियोजनबद्ध रितीने व शांततेत पार पडावा यासाठी भाजपचे जिल्हाभरातील कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. दहावी, बारावी व आयटीआय उत्तीर्ण झालेल्या युवकांना औरंगाबाद, पुणे येथील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने 2 जून रोजी सकाळी 10 वा. एन. एच. अभियांत्रिकी महाविद्यालयात रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यास दोन ते अडीच हजार युवक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. वरील पात्रताधारक युवकांनी 2 जून रोजी आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.