Breaking News

शिक्षकांची पगार बिले वेळेवर न देणा-या 82 शाळांना नोटीस

जळगाव, दि. 24 - शिक्षकांचे पगार वेळेवर होत नसल्याची ओरड दरमहिन्यात कोणत्या ना कोणत्या संघटनेकडून केली जाते. तसेच शिक्षकांकडूनदेखील पगार वेळवर  होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात असते. त्यामुळे शिक्षक व शिक्षकांचे पागार बिले वेळेवर न पाठविणार्या 82 शाळांना आज दि.22 रोजी माध्यमिक  शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी नोटीस बजावली असून संबंधीत शाळांकडून तातडीने खुलासा मागविला आहे.
शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांची पगार बिले दर महिन्याला पहिल्या सात दिवसात वेतन अधीक्षक व भविष्य निर्वाह निधी कार्यालयात सादर करणे अनिवार्य  आहे.मात्र जिल्हयातील 82 शाळांकडून वेळेच्या आत बिले सादर होत नसल्याने कर्मचा-यांच्या पगाराला नहाक विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्याने ही नोटीस  बजावण्यात आली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.
पगार बिले पहिल्या आठवड्यात तर पुरवणी बिले 15 ते 25 तारखेपर्यंत पाठविणो आवश्यक असते. असे असतांना काही शाळांकडून शासनाच्या निर्णयाची  अंमलबजावणी होत नाही. याबाबत जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे सचिव एस.डी.भिरूड यांनीदेखील माध्यमिक शिक्षण अधिकारी देविदास महाजन यांच्याकडे  तक्रार केली होती. त्यानुसार शिक्षणाधिका-यांनी संबंधित 82 शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणो दाखवा नोटीस बजावून आठवड्याभरात खुलासे पाठविण्याचे आदेश  दिले आहेत.